Maharashtra Weather : ऑगस्ट महिन्यात पावसाची काय स्थिती? Watch Video - विदर्भात पुढील 5 दिवस बहुतांश ठिकाणी पाऊस
पुणे : जुलै महिन्यात राज्यातील काही भागात मुसळधार पाऊस झाला, तर काही ठिकाणी कमी प्रमाणात पाऊस झाला. ऑगस्ट महिन्याच्या येत्या आठवड्यातील काही दिवस राज्यातील काही भागात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर हवामान खात्याच्या अंदाजानुसार, ऑगस्ट महिन्यात महिनाभर पाऊस हा सामान्य असल्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील तीन दिवस कोकण, गोवा या ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्र किनारपट्टीवर सोसायट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. त्यानंतर पाऊस सामान्य राहणार आहे. तसेच मध्य महाराष्ट्रात पुढील दोन दिवस पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच विदर्भात पुढील 5 दिवस बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.