महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Sanjay Raut Arrest : औरंगाबादमध्ये खासदार राऊत यांच्या समर्थनार्थ शिवसेनेचे आंदोलन - शिवसेना नेते चंद्रकांत खैरे

By

Published : Aug 1, 2022, 2:28 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:25 PM IST

Sanjay Raut Arrest : संजय राऊत यांच्यावर झालेल्या कारवाई विरोधात शिवसेनेच्या वतीने आंदोलन करत ईडीचा निषेध करण्यात आला. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे आणि आ. अंबादास दानवे यांच्या उपस्थितीत शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केले आहे. शिवसेना खा संजय राऊत यांच्यावर कारवाई होत असताना या कृतीला शिवसैनिक घाबरत नाही. मात्र न्याय सर्वांना सारखा द्या. गेलेल्या आमदारांवर कोणी खर्च केला. इतके दिवस या लोकांनी मुक्काम केला, हॉटेल मधे निवास केला, विमानाने प्रवास केला, बसमधे फिरले, इतके पैसे कोणी दिले याची चौकशी कोण करणार, न्याय सर्वांना सारखा असावा अस मत शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी उपस्थितीत केला आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:25 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details