Maharashtra Rain Update : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सप्टेंबरमध्ये राज्यात समाधानकारक पाऊस - Rainfall In States
Published : Sep 4, 2023, 11:12 AM IST
पुणे : Maharashtra Rain Update : गेल्या दीड महिन्याभरापासून पावसानं हजेरी लावलेली नाही. यामुळं शेतकरी चिंताग्रस्त झाला असून, त्याच्यावर दुबार पेरणीचं संकट ओढवलंय. तर ऑगस्ट महिन्यात राज्यात काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला, तर काही ठिकाणी पावसानं दांडी मारल्याचं चित्र पाहायला मिळालं. राज्यात एकूणच कमी झालेल्या पावसामुळे शेतकरी चिंतेत आहे. राज्यात दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली. त्याचबरोर मराठवाडा दुष्काळाच्या सावटाखाली आलाय.
सप्टेंबरमध्ये राज्यात पाऊस : अशातच हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार, शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. (Weather Update) येत्या दोन दिवसात राज्यात पुन्हा एकदा पाऊस सक्रिय होणार आहे. (Maharashtra Rain News) सप्टेंबर महिन्यात राज्यात समाधानकारक पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. (Maharashtra Rain Update) तसेच एकूणच सप्टेंबर महिन्यात राज्यात पावसाची कशी परिस्थिती असणार आहे, ते या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात....