नवीन वर्षात वाचाळवीरांना सुबुद्धी यावी अशी ईश्वरचरणी प्रार्थना- देवेंद्र फडणवीस - संजय राऊत
Published : Jan 1, 2024, 2:11 PM IST
नागपूर Devendra Fadnavis News : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नववर्षात वाचाळवीरांना सद्बुद्धी मिळो अशी कामना केली आहे. एका प्रकारे त्यांनी अप्रत्यक्षरीत्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना हा टोमणा लगावल्याचं बोललं जातंय. नागपूर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी आले असता त्यांनी विमानतळावर माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, नवीन वर्षाच्या सर्वांना खूप शुभेच्छा आहेत. नवीन वर्ष सर्वांनाच सुख समाधानाचं जावो. खरं म्हणजे जनतेच्या ज्या अपेक्षा आहे, त्याच अपेक्षा आमच्यादेखील असतात. नवीन वर्षात ज्या काही लोकांच्या आशा, आकांक्षा, अपेक्षा आहे, त्या पूर्ण करता याव्या एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे. तसंच नवीन वर्षाच्या निमित्तानं जे वाचाळवीर आहेत त्यांना सुद्धा सुबुद्धी यावी अशी देखील एक ईश्वरचरणी प्रार्थना असल्याचं ते म्हणाले आहेत.