महाराष्ट्र

maharashtra

घटना तज्ञ उल्हास बापट

ETV Bharat / videos

Maharashtra Political crisis : सुप्रीम कोर्टाचाही निर्णय चुकू शकतो, निर्णय हा मुख्यमंत्री शिंदे यांच्या बाजूने लागला- घटना तज्ञ उल्हास बापट - राज्यातील सत्तासंघर्ष

By

Published : May 12, 2023, 7:23 AM IST

पुणे :संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या राज्यातील सत्तासंघर्षावर  सर्वाच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे. 16 आमदारांच्या अपात्रतेबाबतचा निर्णय हा आत्ता विधानसभा अध्यक्षांकडे सोपविण्यात आला आहे. तर राज्यपाल यांच्या निर्णयाबाबत न्यायालयाने ताशेरे ओढले आहे. आजच्या या निर्णयावर घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी आपले मत व्यक्त केले आहे. ते म्हणाले की, आजचा न्यायालयाचा निर्णय हा संपूर्णपणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाजूने लागला आहे. यावेळी ते म्हणाले की, मी आपल्याला आधीच सांगितले आहे की, सर्वोच्च न्यायालय  सांगेल तो कायदा असतो. मी सांगेल तो कायदा नसतो. पण सर्वोच्च न्यायालय अनेक वेळा चुका करू शकतो. आणीबाणीमध्ये माणसाला जगण्याचा अधिकार नाही, असे चार विरुद्ध एक सदस्यीय घटनापीठाने  निर्णय दिला होता. हा निर्णय चुकीचा होता. जगण्याचा अधिकार काढून घेता येत नाही. तसेच या ठिकाणी माझे असे मत आहे की, इथे कुठेतरी सर्वोच्च न्यायालयाची  चूक होत आहे. आता ती दुरूस्त करण्याकरता मोठ्या घटनापीठाकडे जावे लागेल.  

ABOUT THE AUTHOR

...view details