महाराष्ट्र

maharashtra

प्रफुल्ल पटेल

ETV Bharat / videos

Maharashtra Political Crisis : शिवसेनेची विचारधारा स्वीकारू शकतो, तर भाजपची का नाही? प्रफुल्ल पटेलांचा सवाल

By

Published : Jul 5, 2023, 5:56 PM IST

मुंबई - अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत असलेले माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी बुधवारी पाटणा येथे झालेल्या विरोधी पक्षांच्या बैठकीचा खरपूस समाचार घेतला. त्यांनी बदल घडवून आणण्याच्या विरोधी पक्षांच्या दाव्याची जोरदार खिल्ली उडवली. बैठकीत आलेल्या अनेक पक्षांचा केवळ एकच खासदार होता, तर काही पक्षांकडे एकही खासदार नव्हता. असे दृश्य पाहिल्यावर मला तेव्हा हसू आल्यासारखे झाले असे ते म्हणाले. आमचा एनडीएमध्ये सामील होण्याचा निर्णय देश आणि आमच्या पक्षासाठी आहे, वैयक्तिक फायद्यासाठी नाही, असेही ते म्हणाले. ते म्हणाले की, जेव्हा आम्ही शिवसेनेची विचारधारा स्वीकारू शकतो, तेव्हा भाजपसोबत जायला काय हरकत आहे? आम्ही स्वतंत्र अस्तित्व म्हणून या युतीमध्ये सहभागी झालो आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले. 

ABOUT THE AUTHOR

...view details