महाराष्ट्र

maharashtra

भुजबळ समर्थकांचा जल्लोष

ETV Bharat / videos

Maharashtra Political Crisis : मंत्रीपदाची शपथ घेताच येवल्यात भुजबळ समर्थकांचा जल्लोष - Bhujbal supporters celebration in yeola

By

Published : Jul 2, 2023, 6:11 PM IST

नाशिक :महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी घडामोड आज घडली आहे. अजित पवार यांच्यानंतर येवल्याचे आमदार छगन भुजबळ यांनी देखील मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यामुळे येवल्यातील भुजबळ समर्थकांनी भुजबळांच्या संपर्क कार्यालयावर डीजेच्या तालावर नाचत एकमेकांना पेढे भरवत फटाके फोडून एकच जल्लोष साजरा केला. यावेळी राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. आज मोठ्या राजकीय उलथापालथीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे छगन भुजबळ यांच्यासह 29 पक्षाच्या आमदारांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र सरकारमध्ये सामील झाले आहेत. पवारांसोबतच त्यांच्या राष्ट्रवादीच्या आठ सहकाऱ्यांनीही महाराष्ट्रात मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यामुळे भुजबळ समर्थक कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून आला. ते फटाके फोडून, नाचून त्यांचा आनंद साजरा करताना दिसत आहे. आज दुपारी मंत्रीपदाची शपथ घेताच येवल्यात भुजबळ समर्थकांनी मात्र जल्लोष साजरा केला आहे. 

ABOUT THE AUTHOR

...view details