महाराष्ट्र

maharashtra

विलास लांडे

ETV Bharat / videos

Maharashtra Politics : अजित पवारांच्या शपथविधीपूर्वी माजी आमदार विलास लांडे यांनी दिली होते सूचक संकेत - Ajit Pawar

By

Published : Jul 2, 2023, 3:33 PM IST

पुणे-काही दिवसांपूर्वी, आपल्याला विरोधी पक्षनेते पदात रस नसून मला संघटनेत काम द्या, अशी मागणी विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी केली होती. तेव्हापासूनच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घडामोडींना वेग आला होता. आज अजित पवार यांच्या मुंबईतील देवगिरी बंगल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला सुप्रिया सुळे आणि प्रफुल पटेल हे दोन्ही कार्याध्यक्ष देखील उपस्थित होते. आज सकाळीच माजी मंत्री अनिल देशमुख, पिंपरी चिंचवडचे माजी आमदार विलास लांडे, नाना काटे, संजोग वाघीरे यांनी शरद पवारांची भेट घेतली. आजच्या घडामोडींवर माजी आमदार विलास लांडे म्हणाले की, 'दोन दिवसापूर्वी आषाढी एकादशी झाली. आज आम्ही आमच्या पंढरपूरला भेटायला आलो आहे. पक्षात नेमंक काय सुरू आहे आम्हाला माहीत नाही. पवार साहेब जो निर्णय घेतील तो मान्य असेल. त्यांचा शब्द हा अंतिम शब्द असेल. पक्षात कुठलेही गट तट नाहीत'. शरद पवार बोलतील तिकडे आम्ही जाणार असल्याचे यावेळी लांडे यांनी सांगितले. अजित पवार यांनी शपथ घेतल्यानंतर लांडे यांची प्रतिक्रिया चर्चेत आली आहे. 

ABOUT THE AUTHOR

...view details