Maharashtra Kesari Wrestler Fight : दोन महाराष्ट्र केसरी पैलवानात झूंज, पंचवीस मिनिटे चाललेली झुंज ठरली बरोबरीत - महाराष्ट्र केसरी मल्लाची कुस्ती
गंगापूर :गंगापूर येथील जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर जय बजरंग बहुउद्देशीय सामाजिक प्रतिष्ठान व व्यायाम मंडळाच्यावतीने कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. रंगलेल्या कुस्तीच्या मैदानात राज्यभरासह परराज्यातून आलेल्या एक हजाराहून अधिक पैलवानांनी सहभाग नोंदवला. या कुस्तीच्या आखाड्यात 2018 व 2019चे महाराष्ट्र केसरी बाला रफिक व हर्षवर्धन सदगीर यांच्यात झालेली शेवटची कुस्ती बरोबरीत सुटल्याने दोघांना दोन लाखाचे बक्षीस विभागून देण्यात आले.
दोन महाराष्ट्र केसरी मल्लाची कुस्ती रंगतदार :गंगापूर येथील जिल्हा परिषदेच्या मैदानावर कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्रभरातील 1000 हून अधिक मल्लांनी सहभाग नोंदवला होता. या कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्र केसरी असलेल्या दोन मल्लांनी सहभाग नोंदवला होता. बाला रफिक व हर्षवर्धन सदगीर यांच्यातील सामना या कुस्ती स्पर्धेत रंगतदार ठरला. वीस मिनिटे पेक्षा अधिक चाललेल्या या झुंजीत कोणताही निकाल न लागल्याने दोन्ही महाराष्ट्र केसरी विजेत्यांना दोन लाखाचे बक्षीस विभागून देण्यात आले.
अंतिम सामना बरोबरीत सुटल्याने बक्षीस विभागून : गंगापूर येथील जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर एकापेक्षा एक थरारक कुस्त्या पाहण्यासाठी कुस्तीप्रेमींनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. महाराष्ट्र केसरी असलेले बाला रफिक व हर्षवर्धन सदगीर यांच्यात रात्री दहा वाजता सुरू झालेल्या अंतिम सामन्यात कोणताही निकाल न लागल्याने दोनही महाराष्ट्र केसरी विजेत्यांना दोन लाखांचे बक्षीस विभागून देण्यात आले.
कुस्ती पाहण्यासाठी कुस्तीप्रेमींची गर्दी :जिल्हा परिषद मैदानावर झालेल्या कुस्त्यांचा थरार पाहण्यासाठी माजी नगराध्यक्ष संजय जाधव,शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अविनाश पाटील राष्ट्रवादीचे संतोष माने, अमोल जगताप, भगवानसिंग राजपूत, सोपान देशमुख, राकेश कळसकर, योगेश पाटील, भाग्येश गंगवाल, डॉ.आबासाहेब शिरसाठ, विश्वजीत चव्हाण, आदींसह कुस्तीप्रेमींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
हेही वाचा : Hindu Janakrosh Ralley in Pune : पुण्यात 'या' मागण्यांसाठी हिंदू जन आक्रोश मोर्चा ; हजारो नागरिकांचा सहभाग