Maharashtra-Karnataka governer meeting : महाराष्ट्र व कर्नाटक सीमावाद.. दोन्ही राज्यांच्या राज्यपालांची महत्वपूर्ण बैठक? - Maharashtra Karnataka governer meeting
कोल्हापूरातील रेसिडन्सी क्लब येथे महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी ( Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari ) आणि कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत ( Governor of Karnataka Thawarchand Gehlot ) यांच्यामध्ये दोन्ही राज्यांबाबत महत्वपूर्ण बैठक पार पडत आहे. गेल्या अनेक महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यात अनेक वर्षांपासून सीमावाद सुरू आहे. या वादामुळे अनेक आंदोलने देखील झाली. मात्र आता या बैठकीतून लोकांच्या अपेक्षा वाढल्या असून या महत्त्वाच्या मुद्यावरून कोणता निर्णय होईल ? याकडे सर्वांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. शिवाय अलमट्टी धरणाच्या उंचीबाबत सुद्धा यावेळी चर्चा होईल, असे बोलले जात आहे. त्यानुसार आता आणखी 1 तास ही बैठक सुरू राहणार असून त्यामध्ये दोन्ही राज्यातील जवळपास 10 जिल्हाधिकारी तसेच पदाधिकारी सुद्धा उपस्थित आहेत.
Last Updated : Feb 3, 2023, 8:31 PM IST