VIDEO : अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी विरोधकांचे हातात भोपळा घेऊन आंदोलन - विरोधकांचे हातात भोपळा घेऊन आंदोलन
मुंबई : गुरूवारी राज्याचा अर्थसंकल्प सभागृहात सादर झाला. त्यानंतर आजपासून अर्थसंकल्पावर चर्चा होणार आहे. 293 अन्वये विरोधकांच्या प्रस्तावावर चर्चा होणार आहे. तसेच गेल्या आठवडाभरापासून प्रलंबित असणाऱ्या प्रश्नांवर देखील चर्चा करण्यात आली होती. आजही विधीमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी आंदोलन केले. सरकारने अर्थसंकल्पात भोपळा दिला असे सगळ्यांचे म्हणणे आहे. शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेण्यात आले नाही. शेतकऱ्यांना खत खरेदी करण्याकरिता माहिती द्यावी लागते, त्या माहितीमध्ये चक्क जातीचा पर्याय आल्याने विरोधी पक्षनते सभागृहात आक्रमक झाले होते. त्यावरूनही विरोधक आक्रमक झाले होते. यावेळी सर्व विरोधक एकवटले होते. अंबादास दानवे, अदिती तटकरे, रविंद्र वायकर, रोहित पवार, जयंत पाटील, हे उपस्थित होते. त्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली. फलक हातात घेऊन सरकारकडून शेतकऱ्यांना मिळाला भोपळा अशा घोषणा देण्यात आल्या.