शेतकरी झाला कासावीस खोके सरकार ४२०, विरोधकांचे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन - हिवाळी अधिवेशन
Published : Dec 11, 2023, 1:03 PM IST
नागपूर :Maharashtra assembly winter session 2023- शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून विरोधक आज पुन्हा आक्रमक झाले आहेत. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याच्या कामकाजाला आजपासून सुरुवात झाली आहे. अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवसाचे कामकाज सुरू झाल्यानंतर विरोधकांनी कांदा निर्यात बंदी प्रश्नावरून विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधी पक्षाच्या नेत्यांनी तीव्र आंदोलन केलं. यावेळी विरोधकांनी केंद्र सरकारने लावलेली कांदा निर्यांत बंदी हटवण्याची मागणी केली आहे. एकीकडे विमा कंपन्या मालमाल शेतकरी मात्र कंगाल झाल्याच्या घोषणा यावेळी देण्यात आल्या. विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी कांद्याच्या माळा घालीत आंदोलनात सहभाग घेतला. सोयाबीनला ८ हजार रुपये भाव मिळालाच पाहिजे, शेतकरी झाला कासावीस, खोके सरकार ४२० असे फलक विरोधी पक्षाच्या नेत्यांनी हातात घेत घोषणाबाजी केली.