आरोग्य व्यवस्थेची झाली दैना,आरोग्य मंत्री लक्षचं देई ना - विरोधकांचे विधानसभा पायऱ्यांवर आंदोलन - आंदोलन
Published : Dec 12, 2023, 1:04 PM IST
नागपूर :विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज चौथा दिवस आहे. विधानपरिषेदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी तोंडाला मास्क लावून आणि गळ्यात स्टेथस्कोप घेऊन आरोग्य विभागाच्या कारभाराचा निषेध केला आहे. महाराष्ट्रातील आरोग्यव्यवस्था व्हेंटिलेटवर असल्याची टीकादेखील त्यांनी केली. राज्यातील आरोग्य व्यवस्थेचे तीन तेरा वाजले असल्याचा आरोप करत आज विरोधीपक्षाच्या अनेक आमदारांनी विधानसभेच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं. विधानसभा, विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते देखील आजच्या आंदोलनात सहभागी झाले होते. विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधी पक्षांच्या नेत्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे. सरकारी दवाखान्यामध्ये औषध साठा नसल्याचं अंबादास दानवे यांनी यावेळी सांगितलं. शासकीय रुग्णालयात नर्स आणि डॉक्टर नसल्यानं रुग्णालयातील मृत्यूचे प्रमाण वाढत असल्याचं आमदारांनी हातात फलक घेतले. तसंच आरोग्यसेवा पडली आजारी, कोणत्या तोंडानं म्हणता शासन आपल्या दारी, असे फलक आमदारांनी हातात घेतल्याचं दिसून आले.