महाराष्ट्र

maharashtra

टेकडीच्या गणपतीला लाडूचा महाप्रसाद

Mahaprasad To Tekdi Ganesh : टेकडीच्या गणपतीला अकराशे एक किलो लाडूचा महाप्रसाद, पाहा व्हिडिओ

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 26, 2023, 6:13 PM IST

Published : Sep 26, 2023, 6:13 PM IST

नागपूर Mahaprasad To Tekdi Ganesh : गणेशोत्सवानिमित्तानं नागपूरच्या समाजसेवी संस्थेच्या टेकडी गणपतीला 1101 किलोंचा महाप्रसाद अर्पण करण्यात आलाय. गेल्या अनेक वर्षांपासून ही परंपरा कायम आहे. बाप्पाची आरती झाल्यानंतर अकराशे एक किलो लाडूच्या प्रसादाचं भक्तांना वाटप करण्यात आलंय. मध्य भारतातील नागरिकांच्या आस्थेचं श्रद्धास्थान असलेल्या टेकडी गणेश मंदिरात भाविकांची मांदियाळी आपल्याला वर्षभर पाहावयास मिळत असते. नवसाला पावणारा बाप्पा म्हणून देखील टेकडी गणेश (Tekdi Ganesh Nagpur) प्रसिद्ध आहे. सध्या गणेशोत्सव सुरू असल्यानं आपल्या लाडक्या बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या भक्तांच्या संख्येत वाढ झालीय. हेच औचित्य साधून सामाजिक संस्थेकडून 1101 किलो लाडूचा प्रसाद बाप्पाचरणी अर्पण करण्यात आलाय. (ganeshotsav 2023) बाप्पाचरणीवाहिलेली फुलं,हारअशा गोळा होणाऱ्या निर्माल्यापासून टेकडी गणपती मंदिरात धुपकांडी तयार केली जातेय.

ABOUT THE AUTHOR

...view details