Importance of Vatpoornima Vrata : महंत अनिकेत देशपांडे यांनी सांगितले वटपौर्णिमा व्रताचे महत्त्व - वडाच्या झाडाची पूजा करावी
नाशिक : सौभाग्यवती स्त्रियांना अखंड सौभाग्य प्राप्त व्हावं, त्याचबरोबर त्यांच्या पतींना दीर्घायुष्य प्राप्त व्हावे यासाठी वटपौर्णिमेचे अनन्यसाधारण असे महत्त्व हिंदू धर्मामध्ये संस्कृतीमध्ये सांगितले आहे. या वटपौर्णिमेचे व्रत ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी ते ज्येष्ठ शुद्ध पौर्णिमेपर्यंत असं त्रिरात्र, त्रिदिवसीय करण्याचे सांगितले आहे. पण, तीन दिवस जर कोणाला हे व्रत करण्यास जमत नसेल त्यांनी फक्त पौर्णिमेच्या दिवशी अखंड उपवास आणि व्रत करावे. वडाच्या झाडाची पूजा करावी, त्याचबरोबर हिंदू संस्कृतीमध्ये जे दीर्घायुषी वृक्ष आहे. त्याच्यामध्ये वड, पिंपळ, औदुंबर आणि कडुनिंब आदी वृक्षांची लागवड करावी.
Last Updated : Feb 3, 2023, 8:23 PM IST