श्रीमंत दगडूशेठ गणपतीला त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त ४43 मिष्टान्नांचा महानैवेद्य - त्रिपुरारी
Published : Nov 26, 2023, 3:35 PM IST
पुणे Dagdusheth Ganpati Temple Pune : मिठाई, तिखट गोड फराळ अशा वेगवेगळ्या पदार्थांचा तसेच विविध प्रकारच्या फळांचा व भाज्यांचा महानैवेद्य श्रीमंत दगडूशेठ गणपती समोर दाखविण्यात आला. त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त श्रीं ना तब्बल 443 प्रकारचं मिष्टान्न अर्पण करण्यात आलं होतं. लाडक्या बाप्पासमोर मांडलेल्या वेगवेगळ्या पदार्थांचा भव्य अन्नकोट पाहण्याकरिता पुणेकरांनी सकाळपासूनच मोठ्या संख्येनं मंदिरात गर्दी केली. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्यावतीनं त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दगडूशेठ गणपती मंदिरामध्ये अन्नकोट आयोजित करण्यात आला होता. यावेळी ट्रस्टचे विश्वस्त, कार्यकर्ते उपस्थित होते. ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी म्हणाले की, त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त आयोजित अन्नकोटाकरीता पदार्थ देण्याचं आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आलं होतं. त्यानुसार तब्बल ४43 हून अधिक प्रकारचे पदार्थ भाविकांकडून मंदिरात गोळा झाले. ते सर्व पदार्थ अन्नकोटामध्ये मांडण्यात आले. या सर्व पदार्थांचा प्रसाद मंदिरातील भक्तांना देण्यात येणार आहे.