Video : महालक्ष्मीला 2 हजार आंब्याचा महानैवेद्य, मोगऱ्यासह सुवासिक फुलांचा अभिषेक - Mango Mahanaivedya
पुणे : मोगऱ्यासह सुवासिक फुलांचा श्री महालक्ष्मी देवीला पोशाख घालण्यात आला. श्री महासरस्वती व श्री महाकाली देवीचे पुष्पाभिषेक विलोभनीय रुप पहायला मिळाले. मंदिराचा गाभारा व सभामंडपातील विविधरंगी पुष्पांची आरास पाहण्याकरीता देवीभक्तींनी गर्दी केली. सारसबागेसमोरील श्री महालक्ष्मी मंदिराच्या परिसरात मोगऱ्याच्या हजारो फुलांचा सुगंध दरवळत होता. यावेळी आंबा महोत्सव देखील साजरा करण्यात आला. श्री महालक्ष्मी मंदिर, श्री बन्सीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक व सांस्कृतिक ट्रस्ट च्यावतीने अक्षयतृतीयेच्या निमित्ताने वासंतिक मोगरा व आंबा महोत्सव साजरा करण्यात आला. तब्बल १५१ किलो मोगरा, २५१ गुलाबाच्या फुलांच्या गड्डया, चाफा, जाई-जुई, गुलछडी, झेंडू यांसह अनेक फुलांची आरास करण्यात आली. तसेच मंदिरात आंबा महोत्सव देखील साजरा करण्यात आला. तब्बल २ हजार आंब्याचा महानैवेद्य देवीला दाखविण्यात आला होता. यावेळी ट्रस्टचे संस्थापक विश्वस्त राजकुमार अग्रवाल, प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल, विश्वस्त अॅड. प्रताप परदेशी, हेमंत अर्नाळकर, विश्वस्त नगरसेवक प्रविण चोरबेले आदी उपस्थित होते.
Last Updated : Feb 3, 2023, 8:23 PM IST