महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Madhya Pradesh tiger cubs rescue : पाण्याच्या शोधात निघालेल्या बछड्यांना ग्रामस्थांची काठ्यांनी मारहाण, वनविभागाकडून सुटका - वाघाचे बछडे सिवनी वनविभाग

By

Published : May 18, 2022, 8:36 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:23 PM IST

सिवनी ( भोपाळ ) - उन्हाळ्यामुळे वन्यप्राण्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. मध्य प्रदेशातील बेळगावात मंगळवारी पाण्याच्या शोधात भटकणाऱ्या वाघाच्या दोन बछड्यांना ग्रामस्थांनी घेरले. ग्रामस्थांनी काठ्या आणि दगडांनी बछड्यांना मारण्याचा प्रयत्न केला. ही माहिती वन कर्मचाऱ्यांना मिळाली. यानंतर पोलिसांचा ताफा उगलीहून बेळगावकडे रवाना झाला. बऱ्याच प्रयत्नांनंतर वन कर्मचाऱ्यांनी ग्रामस्थांच्या तावडीतून दोन्ही पिल्लांची सुटका करण्यात आली. उगली स्टेशन प्रभारी एसएस भारद्वाज यांनी सांगितले की, दोन्ही बछडे तलावात पाणी पिण्यासाठी आली होती. तलावाजवळ तेंदूपत्त्याची झाडे आहेत. इकडे ग्रामस्थांनी दोन्ही बछडे पाहून इतर ग्रामस्थांना बोलावले. मोठ्या संख्येने ग्रामस्थ हातात काठी घेऊन घटनास्थळी पोहोचले. यानंतर ग्रामस्थांनी जमाव करत बछड्यांना घेराव घातला. वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून ग्रामस्थांचा राग शांत केला. दोन्ही बछड्यांनी सुटका केली. बचावकार्यानंतर वाघाच्या दोन्ही बछड्यांना रेस्क्यू वाहनाने ( Villagers attacked cubs in Seoni ) कान्हा नॅशनल पार्कच्या झोन अंतर्गत गोरिल्ला पॉइंट रेस्क्यू सेंटरमध्ये आणण्यात ( Seoni forest department team rescue two cubs )आले. येथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
Last Updated : Feb 3, 2023, 8:23 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details