महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

A man who eats sand: ऐकल का? चक्क 40 वर्षांपासून वाळू खातो माणूस - उत्तर प्रदेशातील व्यक्ती वाळू खातो

By

Published : Jun 7, 2022, 5:50 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:23 PM IST

ब्रह्मपूर (ओडिशा) - उत्तर प्रदेशातील अरंगापूर येथील रहिवासी असलेला 68 वर्षीय व्यक्ती गेल्या 40 वर्षांपासून वाळू खात आहे. हरिलाल सक्सेना हे दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण करून दररोज मूठभर वाळू खातात. हिरालाल एक बांधकाम कामगार आहेत. गंजम जिल्ह्यातील लौडीगा पंचायत अंतर्गत रंगेलुंडा ब्लॉकमधील कीर्तिपूर गावात कियाफुल भाटी येथे मजूर म्हणून काम करत असल्याचे सांगतात, की त्यांनी वाळू खाल्ली नाही तर त्यांना अस्वस्थ वाटते. परंतु, यासाठी त्यांना कधीही आरोग्याशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागला नाही. गेल्या १२ वर्षांपासून ओडिशात असलेले हिराला म्हणाले, "जेवणानंतर किंवा आधी मी सहसा वाळू खातो. यामुळे मला समाधान मिळते. मी उत्तर प्रदेशात असतानाही नदीच्या काठावर जाऊन वाळू खायचो". हिरालाल यांची वाळूची भूक इतकी तीव्र होती की, पावसाळ्यापूर्वी त्यांनी वाळूच्या पोत्या गोळा करून घरी साठवल्या. वर्षानुवर्षे त्याला पाहत असलेल्या स्थानिक मजुरांनी सांगितले की त्यांनी त्याला आजारी पडताना पाहिले नाही.
Last Updated : Feb 3, 2023, 8:23 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details