महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Video महाराष्ट्रातील खासदारांचा संसदेत आवाज.. भावना गवळी, प्रतापराव जाधव, चिखलीकर, श्रीनिवास पाटलांनी मांडले महत्त्वाचे मुद्दे

By

Published : Dec 20, 2022, 3:06 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:36 PM IST

नवी दिल्ली: लोकसभेच्या हिवाळी अधिवेशनात Loksabha Winter Session 2022 महाराष्ट्रातील खासदार अनेक महत्त्वाच्या प्रश्नांवर बोलत Maharashtra MPs in Loksabha आहेत. प्रधानमंत्री आवास योजनेत देण्यात येत असलेल्या रकमेत वाढ करण्याची मागणी शिवसेना (शिंदे गट) खासदार भावना गवळी MP Bhavana Gawali यांनी लोकसभेत केली. साताऱ्यात प्रधानमंत्री ग्रामसडक योजना ३०० किमी रस्ते बनवायचे मात्र कामे होत नसल्याने यात लक्ष देण्याची मागणी राष्ट्रवादीचे खासदार श्रीनिवास पाटील MP Shrinivas Patil यांनी लोकसभेत केली. बुलढाण्यात शेतकऱ्यांना बँकांच्या किचकट नियमांमुळे शेतकऱ्यांना कर्ज मिळणे अवघड झाले आहे. शेतकरी कर्जासाठी सिबिल स्कोअर पाहण्यात येत असून, स्कोअर कमी आल्यास बँका कर्ज देत नाहीत. याप्रकरणी बँकांच्या नियमात शेतकऱ्यांना सूट देण्याची मागणी शिवसेना खासदार प्रतापराव जाधव MP Prataprao Jadhav यांनी केली. चीनने ताब्यात घेतली जमीन ६० वर्षांनंतरही भारताला परत घेता आलेली नाही. २०१४ नंतर सरकार बदलले असून, १९६२ च्या भारताच्या संकल्पाला हे सरकार पूर्ण करेल, त्यासाठी आवश्यक पाऊले उचलण्याची मागणी भाजप खासदार प्रतापराव चिखलीकर MP Prataprao Chikhalikar यांनी केली.
Last Updated : Feb 3, 2023, 8:36 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details