Local Businessmens Reactions : राज्यपालांनी चुकीचे विधान केले - स्थानिक व्यापाऱ्यांचे मत - Local Businessmen Reacts
मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी ( Governor Bhagat Singh Koshyari ) यांनी काल मुंबईतील अंधेरी पश्चिम परिसरात ( Andheri West area of Mumbai ) दिवंगत शांतीदेवी चंपालाल कोठारी ( Shantidevi Champalal Kothari ) या चौकाचे नामकरण करताना वादग्रस्त विधान केले. त्यांनी सार्वजनिक कार्यक्रमात काल म्हटले की, "गुजराती आणि राजस्थानी लोक आणि त्यांचा पैसा महाराष्ट्रातून बाहेर काढल्यास त्यांना वजा केल्यास मुंबई आर्थिक राजधानी होणार ( Mumbai Financial Capital ) नाही." या त्यांच्या वादग्रस्त विधानानंतर ( After Controversial Statement ) राज्यपाल यांच्यावर देशभर चौफेर टीका झाली. सर्व राजकीय पक्षांनी राज्यपालांच्या या विधानाचा समाचार घेतला. भारतीय जनता पक्षानेदेखील 'राज्यपालांच्या या विधानाशी सहमत नाही' असे नमूद केलेले आहे. या प्रकारानंतर प्रत्यक्ष अंधेरीतील दाऊदबाग या परिसरात जेथे दिवंगत शांतीदेवी चंपालाल कोठारी या नावाने चौकाचे नामकरण केले गेले. येथील राजस्थानी, गुजराती, मराठी, हिंदी, मुस्लिम, हिंदू अशा विविध स्थानिक व्यापाऱ्यांशी संवाद साधला. त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. पाहूया सविस्तर वृत्तांत.
Last Updated : Feb 3, 2023, 8:25 PM IST