महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Lumpy Skin Vaccination: लंपी स्किनच्या लसीकरणासाठी धावाधाव, पशुधन विकास अधिकाऱ्यांनी घोड्यावरून गाठले गाव - Livestock Development Officer

By

Published : Sep 23, 2022, 5:33 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:28 PM IST

वाशी ( उस्मानाबाद ) : राज्यभरात लंपी व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. अशा परिस्थितीत अधिकारी कर्तव्यतत्परतेने काम करत आहेत, असे चित्रही समोर येत आहे. वाशी तालुक्यातील बाराते वस्तीकडे जाणारा रस्ता संपूर्ण चिखलमय झाल्यामुळे वस्तीपर्यंत पोहोचणे जिकीरीचे बनले होते. अशा परिस्थितीत लंपी स्कीन रोगाचे लसीकरण (vaccinating Lumpy Skin vaccine at Osmanabad) करण्यासाठी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर बाबर पशुपालकाच्या घोड्यावर बसून बाराते वस्तीकडे गेले आणि तेथे पोहोचल्यानंतर त्यांनी 450 पशुधनांचे लसीकरण (lumpy skin disease vaccination in cattle) केले. पारगाव पशुवैद्यकीय दवाखान्याअंतर्गत पारगाव ,जणकापूर, हातोला, रुई, लोणखस, जेबा, ब्रह्मगाव, पांगरी घाट पिंपरी ही गावे येतात. या गावातील पशुधनांची संख्या जवळपास चार हजाराहून अधिक आहे. तर जनकापूर गावातील बाराते वस्तीवरील पशुधनाच्या लसीकरणासाठी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोड्यावरून प्रवास (Veterinary Officer Horse Riding) केला. त्यामुळे या परिसरात असलेला रस्त्याचा प्रश्न कधी मार्गी लागणार, असा प्रश्न ग्रामस्थांकडून विचारण्यात येत आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:28 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details