महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Live in Relationship : लिव्ह इन रिलेशनशिप नातं नव्हे तर एक डिल, पाहा व्हिडिओ.. - Live in relationships

By

Published : Nov 22, 2022, 10:43 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:33 PM IST

पुणे श्रद्धा वालकर खून प्रकरणात Shraddha Walker murder case दिवसेंदिवस नवीन गोष्टी समोर येत आहेत. श्रद्धा आणि आफताब हे दोघेही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. यानंतर देशभरात लिव्ह इन रिलेशनशिपबाबत चर्चा सुरू झाली आहे. लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या मुलीला त्रास झाल्यावर तिच्या घरचे तिला जवळ करत नाहीत. समाज स्वीकारत नाही, अशावेळी तिने काय करावे. कायद्याचे संरक्षण आहे का? लिव्ह इन मध्ये दोघांमध्ये वाद होण्याची कोणकोणती कारणे असतात. यासंदर्भात वकील प्राजक्ता आगटे यांच्याशी आमच्या प्रतिनिधींनी खास बातचीत केली आहे. याबाबत प्राजक्ता यांनी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये काय काय करारनामा केला जातो. नेमक्या कोणकोणत्या गोष्टींवर त्यांची भांडणे होतात. तसेच लिव्ह इन रिलेशनशिप हे नाते नव्हे तर एक डिल असते, असे यावेळी प्राजक्ता आगटे यांनी सांगितले आहे. पाहूयात...
Last Updated : Feb 3, 2023, 8:33 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details