Live In Relationship : लिव्ह इन रिलेशनशिप बाबत रोज तक्रारी, महिन्याला येतात तीसहून अधिक तक्रारी - Awareness of live in relationships
औरंगाबाद - लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या युवतीच्या हत्येने देश हादरला आहे. मात्र प्रत्येक शहरात अशा घटना होण्याची शक्यता ( Live in relationship ) नाकारता येत नाही. कारण लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या जोडप्यांच्या तक्रारी ( Live in relationship complaints ) येत असतात. औरंगाबाद मधे रोज एक किंवा दोन तक्रारी प्राप्त होत असल्याची माहिती भरोसा सेलच्या पोलीस निरीक्षक आम्रपाली तायडे यांनी दिली. लिव्ह इन रिलेशनशिप बाबत मुलींमध्ये जनजागृती ( Awareness of live in relationships ) करने गरजेचे आहे. त्यासाठी पोलीस विभाग प्रत्येक वेळी महाविद्यालयात जाऊन जनजागृती करण्याचे काम करत असतात. मात्र कुटुंबीयांनी मित्र परिवाराने याबाबत जागरूकता केली तर त्याचा परिणाम होईल असा विश्वास भरोसा सेल निरीक्षक आम्रपाली तायडे यांनी व्यक्त केला.
Last Updated : Feb 3, 2023, 8:32 PM IST