महाराष्ट्र

maharashtra

बिबट्याचा वावर वाढला

ETV Bharat / videos

leopard News : सावधान...! छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात बिबट्याचा वावर; पाहा व्हिडिओ - बिबट्या

By

Published : Jul 27, 2023, 3:18 PM IST

पुणे: बिबट्यांचे दर्शन आणि नागरी वस्तीतील मुक्तसंचार आता नवीन बाब राहिलेली नाही. पाळीव प्राण्यांवर हल्ले करणारा बिबट्या आता नागरीकांवर देखील हल्ले करू लागला आहे. बुधवारी रात्रीच्या सुमारास जुन्नर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय परिसरामध्ये बिबट्याचा वावर पाहायला मिळाला. जुन्नर येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय हे शासकीय रुग्णालय असून येथे तालुक्यातील मोठ्या प्रमाणात नागरिक हे उपचारासाठी येत असतात. अशातच अशा पद्धतीने बिबट्याचा वावर पाहायला मिळत असल्याने, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पाहण्यास मिळत आहे. जुन्नरमध्ये मोठ्या प्रमाणावर विविध ठिकाणी बिबट्याचा वावर पाहायला मिळत आहे. तसेच माणिकडोह येथील बिबट निवारण केंद्रही आहे. आता किल्ल्याच्या पायथ्याशी लोकवस्तीत बिबट्याचा वावर पाहायला मिळत आहे. असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्याची पुष्टी ईटीव्ही भारत करत नाही.

ABOUT THE AUTHOR

...view details