महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Viral Video सफरचंदाच्या क्रेटने बिबट्याला पकडण्याचा प्रयत्न.. शेपटी धरून ओढले मागे.. मग बिबट्याने काय केले ते पहाच.. - सफरचंदाच्या क्रेटने बिबट्या पकडायचा प्रयत्न

By

Published : Jan 24, 2023, 7:56 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:39 PM IST

रामपूर (हिमाचल प्रदेश): हिमाचल प्रदेशातील बर्फवृष्टीमुळे आता वन्य प्राणी वस्तीकडे वळू लागले आहेत. सिमला जिल्ह्यातील अनेक भागात गेल्या काही दिवसांपासून बिबट्या दिसल्याच्या बातम्याही येत आहेत. दरम्यान, बिबट्याला पकडतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ रामपूर उपविभागातील नानखडी येथील आहे. याठिकाणी काही लोक बिबट्याला पकडताना दिसत आहेत.

बिबट्या गेला पळून:प्रत्यक्षात रोहरूच्या गंगानगरनंतर सिमल्याच्या नानखडीमध्ये बिबट्या दिसला. त्यानंतर काही तरुणांनी बिबट्याला पकडण्याचा प्रयत्न केला. या तरुणांच्या या प्रयत्नाचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडिओमध्ये काही तरुण भाजीपाला विकण्याच्या क्रेटमधून बिबट्याचे पिल्लू पकडताना आणि सफरचंदाच्या झाडांचे रक्षण करताना दिसत आहेत. यादरम्यान बिबट्याने तरुणांवर हल्ला करण्याचाही प्रयत्न केला, मात्र बिबट्या पिंजऱ्यात न अडकता पळून गेला. तरुणांचा हा प्रयत्न त्यांच्या जीवावरही ओढावू शकतो.

नागरिकांनी बिबट्याला पकडू नये:माहिती देताना रामपूरचे सहाय्यक वनसंरक्षक तेज सिंह म्हणाले की, गेल्या दिवशी नानखडी परिसरात काही तरुणांनी आपल्या स्तरावर बिबट्याला पकडण्याचा प्रयत्न केला, तो योग्य नाही. परिसरात बिबट्या दिसल्यास वनविभागाला माहिती द्यावी, असेही ते म्हणाले. अशा वेळी विभाग बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावतो, जेणेकरून कोणालाही इजा होऊ नये. अशा बाबतीत लोकांनी वनविभागाला सहकार्य करावे आणि आपल्या स्तरावर बिबट्या पकडण्यासारखे जीवघेणे प्रयत्न करू नयेत, असे आवाहन त्यांनी केले आहे.

हिमाचलमध्ये बिबट्यांचा वावर:शिमला जिल्ह्यातील रामपूर येथील रहिवासी परिसरात सातत्याने दहशत निर्माण करणाऱ्या बिबट्याला नुकतेच पिंजऱ्यात कैद करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वसाहतीत हा बिबट्या धुमाकूळ घालत होता. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये घबराट पसरली होती. मात्र, सोमवारी पहाटे तीनच्या सुमारास हा बिबट्या पिंजऱ्यात कैद झाला. आज सकाळी वनविभागाचे पथक घटनास्थळी पोहोचले असता त्यांना बिबट्या पिंजऱ्यात कैद झाल्याचे दिसले. त्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले. या भागात बराच वेळ बिबट्याचा वावर होता, त्यामुळे स्थानिक लोकांमध्ये भीतीचे वातावरण होते. संध्याकाळनंतर लोकांना घराबाहेर पडणे कठीण झाले होते. त्यामुळे लोकांच्या तक्रारीवरून वनविभागाने दोन दिवसांपूर्वी येथे पिंजरा लावला होता. त्यानंतर आज सकाळी हा बिबट्या पिंजऱ्यात कैद झाला.

हेही वाचा: Bangalore University Leopard बंगळुरू विद्यापीठात बिबट्या घुसल्याची अफवा विद्यार्थी घाबरल्यानंतर वनविभागाने सांगितले

Last Updated : Feb 3, 2023, 8:39 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details