महाराष्ट्र

maharashtra

Leopard enter in film city: सुख म्हणजे काय असते? मालिकेच्या सेटवर बिबट्या दिसताच क्रू मेंबर्सची उडाली घाबरगुंडी, पाहा व्हिडिओ

By

Published : Jul 27, 2023, 10:19 AM IST

मालिकेच्या सेटवर बिबट्याची एन्ट्री

मुंबई: गोरेगाव येथील फिल्मसिटीत मराठी मालिकेचे शुटिंग चालू होते. त्याचदरम्यान बिबट्याने सेटवर एन्ट्री घेतल्याने शुटिंग कर्मचाऱ्यांची पळापळ सुरू झाली. ही घटना बुधवारी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास घडली. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार,फिल्मसिटीमध्ये यावेळी मराठी मालिका सुख म्हणजे काय असते या मालिकेचे शुटिंग चालू होते. शुटिंग चालू असताना बिबट्याची मालिकेच्या सेटवर एन्ट्री झाली.  बिबट्याने कोणावर हल्ला केला नसल्याने कोणतीही जीवित हानी झाली नाही.  या फिल्मसिटीच्या जवळ आरे जंगल आणि नॅशनल पार्क असल्याने तेथे जंगली प्राण्यांचा अधिवास असतो. त्यामुळे वन्यप्राणी फिल्मसिटीमध्ये शिरत असतात.  या प्रकरणी ऑल इंडियन सिने वर्कर्स असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश श्यामलाल गुप्ता म्हणाले की, ज्यावेळी बिबट्या सेटवर शिरला, त्यावेळी सेटवर 200 हून अधिक लोक उपस्थित होते. जर बिबट्याने कुणावर हल्ला केला असता तर याला जबाबदार कोण? फिल्म सिटीत वारंवार बिबट्या शिरल्याच्या घटना समोर येत आहेत. मात्र सरकार  सुरक्षेच्या दुष्टीकोनातून काहीच उपाययोजना करत नाही. सरकारने याकडे लक्ष दिले नाही तर हजारो मजदूर आणि कलाकारांकडून संप पुकारण्यात येईल. 

ABOUT THE AUTHOR

...view details