महाराष्ट्र

maharashtra

बिबट्या दुचाकीसमोर आला

ETV Bharat / videos

Leopard In Front of Bike : दुचाकीसमोर बिबट्याची उडी; मारला अचानक ब्रेक अन्... पाहा व्हिडिओ - Shamgaon Ghat

By

Published : May 8, 2023, 6:17 PM IST

Updated : May 8, 2023, 8:27 PM IST

सातारा:  बिबट्याचा वावर दिवसेंदिवस वाढतच आहे. याआधीही भरवस्तीत बिबट्या किंवा रानटी प्राणी घुसून ग्रामस्थांना त्रास देण्याचे अनेक प्रकार घडले आहेत. वन विभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरीकांनी केली होती. अशातच कराड-वडूज मार्गावरील शामगाव घाटात अचानक बिबट्या दुचाकीसमोर आल्याने दुचाकीवरील तरूणांची चांगलीच भंबेरी उडाली. अचानक बिबट्या समोर आल्याने दुचाकीस्वाराने ब्रेक मारला आणि बिबट्याने रस्ता ओंलाडून घाटाच्या खालच्या बाजूला झेप घेतली. पाठीमागे असलेल्या दुचाकीवरील एक जण मोबाईलमध्ये चित्रीकरण करत असताना, ही घटना त्याच्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाली. ही घटना रविवारी सायंकाळची असून बिबट्याचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. तसेच त्यामुळे रात्री प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी धोका निर्माण झाला आहे.

Last Updated : May 8, 2023, 8:27 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details