महाराष्ट्र

maharashtra

बिबट

ETV Bharat / videos

Leopard Attack : बिबट्याची दहशत! एका आठवड्यात केली दोन कुत्र्यांची शिकार, पहा सीसीटीव्ही फुटेज - Leopard Attack

By

Published : Apr 1, 2023, 7:12 AM IST

हल्दवानीच्या फतेहपूर रेंजमध्ये बिबट्याच्या दहशतीने लोक घाबरले आहेत. आठवडाभरातच बिबट्याने परिसरातील दोन कुत्र्यांची शिकार केली आहे. ताजे प्रकरण काठघरियातील मंगला बिहारचे आहे. येथे भगतसिंग यांच्या घरातून बिबट्याने एक कुत्रा पळवून नेला. आता याचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात बिबट्या कुत्र्याला कसे पळवून नेत आहे, हे स्पष्ट दिसत आहे. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी आजूबाजूच्या जंगलात बिबट्याचा शोध घेतला. मात्र पथकाला बिबट्याची कोणतीही हालचाल दिसली नाही. बिबट्याने कुत्र्याला आपले शिकार बनवण्याची आठवड्यातील ही दुसरी घटना आहे. परिसरात बिबट्याच्या दहशतीमुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. एवढेच नाही तर बिबट्या आणि वाघाच्या भीतीने लोकांना संध्याकाळ होताच घरात कैद व्हावे लागत आहे. वारंवार माहिती देऊनही अद्याप त्यांना पकडण्यात विभागाला यश आले नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले आहे. 

ABOUT THE AUTHOR

...view details