महाराष्ट्र

maharashtra

असिम सरोदे

ETV Bharat / videos

Maharashtra Political Crisis: राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष कोणाचा? कायदेतज्ज्ञ असिम सरोदे म्हणतात.....

By

Published : Jul 3, 2023, 9:29 PM IST

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी (Asim Sarode on ownership of NCP) राष्ट्रवादीतून बंड केल्यानंतर कालपासून राजकीय घडामोडीला वेग आला आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या (Nationalist Congress party) प्रदेशाध्यक्षपदी सुनील तटकरे यांची नियुक्ती झाल्याची घोषणा पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी केली आहे. (Legal expert Asim Sarode) तर अनिल पाटील यांची महाराष्ट्र विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रतोदपदी नियुक्ती केली गेली आहे. (Deputy CM Ajit Pawar) पक्षाने अजित पवार यांची विधिमंडळ नेतेपदी नियुक्ती केली आहे. तर रुपाली चाकणकर यांची राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षापदी निवड करण्यात आली आहे. एकूणच राज्यात पुन्हा एकदा शिवसेनेच्या बाबतीत जी काही न्यायालयीन लढाई पाहायला मिळाली, तीच लढाई आता देखील राष्ट्रवादीत पाहायला मिळत आहे. (Maharashtra Political Crisis) यावर कायदेतज्ज्ञ असिम सरोदे यांनी सांगितले की, एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या मदतीने राजकारणात बेकायदेशीरता आणली आहे. त्यामुळे बंडखोरी करणाऱ्यांना एक अपेक्षित प्रश्नसंच मिळाला आहे. अजित पवार आता जे काही करत आहेत ते एकनाथ शिंदे यांची रीप्लिका आहे, असे म्हणावे लागणार आहे, असे यावेळी सरोदे म्हणाले. सध्या राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंड आणि कायदेशीर बाबी यावर आमचे प्रतिनिधी सज्जाद सय्यद यांनी कायदेतज्ज्ञ असिम सरोदे यांच्याशी खास बातचीत केली आहे...पाहूया...

ABOUT THE AUTHOR

...view details