महाराष्ट्र

maharashtra

कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज

ETV Bharat / videos

Lathi Charged On Bhide Supporter: संभाजी भिडेंच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक, राडा करणाऱ्यांवर लाठीचार्ज - संभाजी भिडेंच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक

By

Published : Aug 2, 2023, 11:01 PM IST

सोलापूर :संभाजी भिडे यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करण्याची परवानगी त्यांच्या समर्थकांनी पोलिसांकडे मागितली होती; परंतु सोलापूर शहर पोलिसांनी याला परवानगी नाकारली होती. भिडे समर्थक शहरातील शिवाजी चौकात दुग्धाभिषेक करणार होते. यावेळी पोलिसांनी या समर्थकांची धरपकड सुरू केली होती. ताब्यात घेऊन आणलेल्या समर्थकांना सोडवण्यासाठी भिडे समर्थक फौजदार चावडी पोलीस ठाण्यासमोर जमले होते. त्यांनी जय श्रीरामच्या घोषणा देत पोलीस ठाणे परिसर दणाणून सोडला होता. अखेर परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाताना पोलिसांनी कडक भूमिका घेतली आणि राडा करणाऱ्या संभाजी भिडेंच्या समर्थकांवर लाठीचार्ज केला. फौजदार चावडी पोलीस ठाण्यासमोर जमलेल्या गर्दीला पांगवण्यासाठी हा लाठीचार्ज करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. या विरोधात भाजपचे माजी नगरसेवक राजकुमार पाटील हे फौजदार चावडी पोलीस ठाण्यात आले होते. मात्र बंदोबस्तावर तैनात असलेल्या पोलिसांनी भाजप नगरसेवकाला बाजूला केले. मी भाजपचा नगरसेवक असून मला देखील मारहाण केली गेली. सोलापूर शहर पोलीस दलातील अधिकाऱ्यांविरोधात कारवाईची मागणी राज्य सरकारकडे करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details