Lasalgaon Onion Market लासलगावच्या कांद्यांने भारताची जगभरात ओळख निर्माण केली - सभापती सुवर्णा जगताप - लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती
नाशिक उत्कृष्ट चवीमुळे जगाच्या पाठीवर लासलगावच्या कांद्यांने Lasalgaon Onion Market भारताची ओळख निर्माण केली आहे. एप्रिल २०२२ ते ऑक्टोबर २०२२ या सात महिन्याच्या कालावधीत १३ लाख ५४ हजार ७९१ मॅट्रिक टन कांदा निर्यात करण्यात आल्याची माहिती लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती सुवर्णा जगताप यांनी दिली आहे. कांद्यांच्या निर्यातीतून देशाला २३५५ कोटी रुपयांचे परकीय चलन Country Get 2355 Crore Income From Onion Export मिळाल्याचेही त्या म्हणाल्या. कांदा उत्पादनात महाराष्ट्र Maharashtra onion exports पहिल्या क्रमांकावर आहे, दुसऱ्या क्रमांकावर गुजरात आणि त्यानंतर अनुक्रमे हरियाणा, ओडिशा, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान या राज्यांमध्ये कांद्याची लागवड केली जाते. बांग्लादेश, मलेशिया, श्रीलंका, नेपाळ, युनाईटेड अरब, इंडोनेशिया, कतार, हाँगकाँग, कुवेत, व्हिएतनाम आदी देशात लासलगावचा कांदा निर्यात होतो.
Last Updated : Feb 3, 2023, 8:38 PM IST