Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांच्या घराबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त - मंत्री शिंदे गुजरात बातमी
ठाणे - महाराष्ट्र सरकारमधील मंत्री एकनाथ शिंदे हे सुरतमध्ये पोहोचले आहेत. येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये ते थांबले असून, त्यांच्यासोबत शिवसेनेचे तसेच अपक्ष आमदार असल्याचे सांगितले जात आहे. एकनाथ शिंदे हे गुजरात भाजपचे अध्यक्ष सी आर पाटील यांच्या संपर्कात असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे शिवसेना पक्षात खळबळ उडाली आहे. दरम्यान, खबदारी म्हणून पोलिसांनी एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवसस्थानाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:24 PM IST