Lalu Prasad Yadav : 'लढलो, लढणार आणि न घाबरता...', 75 वर्षीय लालूंचा बॅडमिंटन खेळतानाचा Video Viral - लालू प्रसाद यादव बॅडमिंटन व्हिडिओ
पाटणा - बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी शुक्रवारी आपल्या इंस्टाग्रामवर वडील लालू प्रसाद यादव यांचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये 75 वर्षीय लालू चक्क बॅडमिंटन खेळताना दिसत आहेत. हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर करताना तेजस्वी यादव यांनी लिहिले आहे की, 'घाबरायला शिकलो नाही...झुकायला शिकलो नाही... लढलो... लढणार... तुरुंगाला न घाबरता शेवटी जिंकणारच'. तेजस्वी या व्हिडिओच्या माध्यमातून भाजपला संदेश देण्याचा प्रयत्न करत असल्याचे मानले जात आहे. व्हिडिओमध्ये लालू प्रसाद यादव खूपच फिट आणि हेल्दी दिसत आहेत. लालू दीर्घकाळापासून आजारी होते. गेल्यावर्षी त्यांच्यावर सिंगापूरमध्ये किडनी प्रत्यारोपण करण्यात आले. त्यानंतर गेल्या काही महिन्यांपासून ते पूर्णपणे फिट दिसत आहेत. पाटण्यातील विरोधी एकजुटीच्या बैठकीतही लालू यादव अगदी फिट दिसत होते. आता आपण पूर्णपणे तंदुरुस्त असून त्यांना नरेंद्र मोदी आणि भाजपला तंदुरुस्त करायचे आहे, असे विधान त्यांनी त्यावेळी केले होते.