Lalbaugcha Raja Darshan : दिग्गज सेलिब्रिटी 'लालबागच्या राजा'चरणी लीन; पाहा व्हिडिओ - सिने अभिनेत्री शिल्पा शेट्टी
Published : Sep 24, 2023, 1:45 PM IST
मुंबई Lalbaugcha Raja Darshan : लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी राजकीय मंडळी आणि सेलिब्रिटींनी रीघ लावली होती. प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांनी सहकुटुंब लालबागच्या राजाचे दर्शन घेतले आणि आरती देखील केली. सकाळी जेष्ठ क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी देखील लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. राजकारणातील मधील प्रसिद्ध चेहरा अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनीही लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. मराठी चित्रपट सृष्टीतील अभिनेता स्वप्निल जोशी आणि गायक स्वप्निल बांदोडकर हे देखील लालबागच्या राजाच्या चरणी नतमस्तक झाले होते.
अनेक सेलिब्रिटींनी घेतले दर्शन : बॉलीवूड मधील सुप्रसिद्ध सिने अभिनेत्री शिल्पा शेट्टी, अदा शर्मा आणि सनी लियोनी यांनी देखील लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. विशेष म्हणजे काश्मीर फाइल्स फेम अदा शर्मा ने लालबागच्या राजाच्या समोर दर्शन घेऊन शंखनाद देखील केला. राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे हे देखील आपल्या पत्नी आणि लहान मुलगा कीयानसह लालबागच्या राजाच्या चरणी लीन झाले होते. गणेशोत्सवाच्या चौथ्या दिवशी दिवसभर लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी सेलिब्रिटींसह राजकीय वर्तुळातील व्यक्तींची रेलचेल पाहायला मिळाली.