शिर्डीत नवीन वर्षाची साईबाबांची दैनंदिनी घेण्यास भाविकांची गर्दी
Published : Dec 31, 2023, 6:23 PM IST
शिर्डी Shirdi New Year २०२४ :नववर्षाच्या स्वागतासाठी लाखो भाविक शिर्डीत दाखल झाले आहेत. शिर्डीत येणाऱ्या भाविकांना साईबाबाचं दर्शन घेता यावं, म्हणून साई मंदिर रविवारी (31 डिसेंबर) 24 तास खुलं राहणार आहे. त्यामुळं साईनगरीत बाजार पेठा सज्ज झाल्या असून, भाविकांनी 2024 या नववर्षाची दैनदिनी घेण्यास मोठी गर्दी केल्याचं दिसून येतंय.साईबाबा संस्थानच्या वतीनं प्रकाशन विभाग चालवलं जातं, ज्यात साई बाबांची दिनदर्शिका, दैनंदिनी, टेबल कॅलेंटर, फोटो कॅलेंडर, अशी प्रकाशनं नववर्षाच्या निमित्तानं प्रकाशित करण्यात येतात. रविवारी वर्षाचा शेवटचा दिवस असल्यानं भाविक साईबाबांच्या दर्शनासाठी रात्रभर दर्शन रांगेत उभे आहेत. त्यामुळं भाविकांसाठी भोजन, बिस्किटांची व्यवस्था करण्यात आली आहे. तसंच व्हीआयपी दर्शन पासेससाठी शनिवारची सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळं भाविकांना दर्शन घेण्यास फायदा होणार आहे.