Pune crime: मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांना अटक; कोम्बिंग ऑपरेशनचे यश, पोलीस आयुक्त रितेश कुमार
पुणे: राजस्थानच्या जयपूर शहरात बॉम्बस्फोट घडवून आणण्याच्या तयारीत असलेले सुफा या आतंकवादी टोळीशी संबंधित दोघांना पोलिसांनी पकडले आहे. या दोन्ही मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांना कोथरूड पोलिसांनी अटक केली आहे. 30 मार्च 2022 रोजी राजस्थान पोलिसांनी एका कारमधून स्फोटके घेऊन जाताना अल्तमसचा मुलगा बशीर खां शेरानी याला पकडले होते. त्यानंतर हा प्रकार समोर आला होता. राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआए) ने या संदर्भात गुन्हा दाखल करून अनेकांना अटक केली होती. मात्र तेव्हापासून युनूस साकी, इमरान आणि फिरोज पठान हे तिघे फरार होते. आइएसआइएस पासून प्रेरणा घेऊन ही संघटना काम करत आहे. यातील इमरान खान आणि युनूस साकी याला अटक केली आहे, तर फिरोज पठाण हा फरार झाला आहे. त्याचा शोध सुरू आहे. याबाबत पोलीस आयुक्त रितेश कुमार म्हणाले की, गेल्या 15 दिवसांपासून पुणे पोलिसांकडून शहरात जे कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात येत आहे. त्यांचे हे यश आहे. ज्या कर्मचाऱ्यांनी पकडले आहे, त्यांना देखील मोठे बक्षीस देण्यात येणार आहे.