महाराष्ट्र

maharashtra

कोल्हापूर बंद

ETV Bharat / videos

Kolhapur Bandh: कोल्हापूर बंदमध्ये तणावाचे वातावरण? 'अशी' आहे आंदोलन स्थळावरील परिस्थिती

By

Published : Jun 7, 2023, 2:05 PM IST

Updated : Jun 7, 2023, 2:28 PM IST

कोल्हापूर :आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्याच्या निषेधार्थ कोल्हापूरमध्ये हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत. त्यामुळे त्यांनी आज कोल्हापूर बंदची हाक दिली आहे. या आंदोलना दरम्यान मटण मार्केट, छत्रपती शिवाजी महाराज चौक, भाऊसिंगजी रोड परिसरात तणाव निर्माण झाला होता. जमाव देखील आक्रमक झाला होता. त्यामुळे प्रशासनाला थोडी आक्रमक भूमिका घ्यावी लागली होती. पोलीसांनी जमावावर लाठीचार्ज देखील केला होता. निर्माण झालेल्या गोंधळामुळे अनेक आंदोलक जखमी देखील झाले होते. परंतु आता मात्र आंदोलन स्थळावरील परिस्थिती निवळलेली आहे. जमाव पांगवण्यात व कायदा सुव्यवस्था राखण्यात पोलीस प्रशासनाला यश मिळाले आहे. कोल्हापूर बंदमध्ये तणावाचे वातावरण काहीसे कमी होताना दिसत आहे. स्वतः रस्त्यावर उतरून जमावाला नियंत्रण आणण्याचा प्रयत्न पोलीस प्रशासनाने केला आहे. 

Last Updated : Jun 7, 2023, 2:28 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details