महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Hearing on state power struggle भारताच्या लोकशाहीच्या दृष्टीने हा निर्णय महत्वाचा - घटनातज्ञ उल्हास बापट - राज्य सत्ता संघर्षावर सुनावणी

By

Published : Sep 7, 2022, 5:46 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST

आज राज्याच्या सत्ता संघर्षावर न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील, पाच सदस्यीय घटनापीठासमोर तातडीने सुनावणी Hearing on state power struggle घेण्यात आली. यानंतर आता २७ सप्टेंबरला सुनावणी होऊन, निर्णय होणार आहे. याबाबत घटनातज्ञ उल्हास बापट Constitutional expert Ulhas Bapat यांनी प्रतिक्रिया दिली असून; ते म्हणाले की, शिंदे गटाची भूमिका ही घटनेच्या दृष्टीने पहिल्यापासूनच मला पटलेली नाही. शिवसेनेची भूमिका ही घटनेला धरून आहे. महाराष्ट्राच्या संघर्षात महत्वाचे प्रश्न होते. या प्रकरणात घटनापीठाची स्थापना व्हायला उशीर झाला आहे. 16 आमदार पक्षांतरबंदी कायद्यानुसार अपात्र झाले तर, सरकार कोसळू शकते. पण आत्ता पुढील सुनावणीत काय होईल? हे पाहावे लागणार आहे. याचा लवकरात लवकर निकाल लागायला हवा. भारताच्या लोकशाहीच्या दृष्टीने हा निर्णय महत्वाचा This decision is important for India democracy आहे. माझे तर मत असे आहे की, आठ दिवसांत निर्णय लावावा. मात्र सुप्रीम कोर्टाच काय ते वेगळे मत असू शकते, असे यावेळी बापट म्हणाले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details