महाराष्ट्र

maharashtra

Knife in Stomach

ETV Bharat / videos

Knife in Stomach : पाच वर्षांपासून पोटदुखीचा तरुणाला त्रास, एक्स-रे पाहून डॉक्टर झाले थक्क! - शरीर तपासणी

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 30, 2023, 8:06 AM IST

अंकलेश्वर (गुजरात) Knife in Stomach : गुजरातमधील अंकलेश्वर येथील एक तरुण भरूच सिव्हिल हॉस्पिटलच्या डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळं गेल्या 5 वर्षांपासून पोटात चाकू घेऊन जगतोय. मिळालेल्या माहितीनुसार, 5 वर्षांपूर्वी अंकलेश्वर गार्डन सिटीमध्ये राहणाऱ्या एका तरुणाला चाकूनं जखमी केलं होतं. हा तरुण डॉक्टरांकडे उपचारासाठी गेला असता डॉक्टरांनी त्याची नीट तपासणी न करता केवळ औषध देऊन त्याला परत पाठवलं. मात्र, काही दिवसांनी तरुणाच्या पोटात अधूनमधून दुखू लागले. अशातच पाच वर्षांनंतर अतुल गिरी पुन्हा अपघाताचा बळी ठरला. खासगी रुग्णालयात उपचारासाठी गेलेल्या तरुणानं गेल्या पाच वर्षांपासून पोटदुखीचा त्रास होत असल्याची माहिती डॉक्टरांना दिली. डॉक्टरांनी तरुणाच्या संपूर्ण शरीर तपासणीसाठी एक्स-रे काढला तेव्हा  डॉक्टरही आश्चर्यचकित झाले. तरुणाच्या पोटात चाकू स्पष्ट दिसत होता. आता त्याच्या पोटात 5 वर्षांपासून पडलेला चाकू काढण्यासाठी ऑपरेशन केलं जाणार आहे. 

ABOUT THE AUTHOR

...view details