महाराष्ट्र

maharashtra

किरीट सोमय्या

ETV Bharat / videos

Sharad Koli On Kirit Somaiya: किरीट सोमैयांनी भाजपची लाज घालवली - शरद कोळी - Sharad Koli On Kirit Somaiya

By

Published : Jul 18, 2023, 5:31 PM IST

सोलापूर : भाजप नेते किरीट सोमैया यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने राज्यभर एकच वादळ उठले आहे. ठाकरे गटाचे युवा सेना राज्यविस्तारक शरद कोळी यांनी भाजपला टार्गेट करत सोमैयांवर सडकून टीका केली आहे. एका व्हिडीओच्या माध्यमांतून किरीट सोमैया हे उघडे-नागडे झाले आहेत. त्यांनी भाजपची उरली-सुरली लाज घालवली आहे. भाजपच्या नेत्यांनी मूग गिळून गप्प न राहता किरीट सोमैयांची भाजपमधून हकालपट्टी केली पाहिजे, अशी मागणी शरद कोळी यांनी केली आहे. किरीट सोमैया यांनी सोशल मीडियावर व्हिडीओ कॉलिंग करताना अंगावरील सर्व कपडे काढून अश्लील चाळे केल्याचा व्हिडीओ वायरल झाला आहे. शाहू, फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात राजकीय नेत्यांनी असे कृत्य केले तर महाराष्ट्राची अब्रू जाईल, अशी तिखट प्रतिक्रिया युवा सेना राज्य विस्तारक शरद कोळी यांनी दिली आहे. भाजपमधील वरिष्ठ नेत्यांनी ताबडतोब किरीट सोमैया यांची हकालपट्टी करावी, अशी मागणी त्यांनी लावून धरली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details