महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

BJP leader Kirit Somaiya छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलताना काळजी घ्यावी - किरीट सोमय्या - Chhatrapati Shivaji Maharaj

By

Published : Dec 5, 2022, 6:35 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:34 PM IST

छत्रपती शिवाजी महाराज Chhatrapati Shivaji Maharaj हे हिंदू धर्माचे रक्षक Defender of Hinduism आहेत. त्यांच्याबाबत बोलताना काळजी घेतली पाहिजे. बोलण्यात चूक झाली असेल तर सुधारायला हवी, अस वक्तव्य भाजप नेते किरीट सोमय्या BJP leader Kirit Somaiya यांनी केले आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजप चे आमदार प्रसाद लाड यांनी नुकतीच वादग्रस्त वक्तव्ये केली आहेत त्यावर सोमय्या यांनी अप्रत्येक्षरित्या टिपण्णी केली आहे. ते मावळमधील तळेगाव येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. किरीट सोमय्या म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज हे देशासाठी पूजनीय आहेत. ते हिंदू धर्माचे रक्षण करणारे आहेत. त्यांचा संबंध हिंदुस्थान ला अभिमान आहे. प्रत्येक जण त्यांच्या कार्याच कौतुक करतो. त्यांच्याकडे आदराने प्रेमाने पाहतो. पुढे ते म्हणाले की, कुठे कोणाची बोलण्यात चूक झाली असेल तर त्यांनी काळजी घेतली पाहिजे. शिवाजी महाराज यांना सर्व जण मानतात. कोणाची बोलण्यात चूक झाली असेल तर त्यांनी काळजी घेतली पाहिजे, चूक सुधारायला हवी. गरज, पडल्यास माफी मागितली पाहिजे अस किरीट सोमय्या म्हणाले आहेत. पुढे ते म्हणाले की, आज पासून पतसंस्थेतील घोटाळे बाहेर काढणार आहे. पतसंस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांवर अत्याचार केले जातात. त्याच पतसंस्थेच्या भ्रष्ट्राचार काढण्याची सुरुवात राष्ट्रवादी च्या मंचर येथून करणार आहे. अस किरीट सोमय्या यांनी सांगितलं आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:34 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details