Kirit Somayya किशोरी पेडणेकर लवकरच तुरुंगात जातील - किरीट सोमैय्या - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई शिवसेना नेत्या, मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर Former Mayor Kishori Pednekar आणि दादर एसआरए घोटाळ्याचे आरोपी चंद्रकांत चव्हाण Chandrakant Chavan हे सख्खे शेजारी आहेत. यांनी मुंबईत आणखी काही एसआरए घोटाळे केले असून किशोरी पेडणेकर लवकरच तुरुंगात जातील असा इशारा भाजप नेते किरीट सोमैय्या यांनी दिला आहे. मुंबई ते बोलत होते. किरीट सोमैय्या यांनी दादर एसआरए घोटाळाप्रकरणी चंद्रकांत चव्हाण यांच्याविरोधात दाखल गुन्ह्याची प्रत व किशोरी पेडणेकर यांच्या निवडणुकीचा अर्ज ट्विट केला आहे. पेडणेकर व परिवार यांच्यावर फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी सोमय्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे Deputy Chief Minister Devendra Fadnavis केली आहे. किशोरी पेडणेकर लवकरच तुरुंगात जातील असे किरीट सोमैय्या Kirit Somayya म्हणाले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:30 PM IST