महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

KGF Chapter 2 : रॉकी भाईच्या चाहत्यांनी केले KGF 2 चे भव्य स्वागत - रॉकिंग स्टार यश

By

Published : Apr 14, 2022, 6:59 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:22 PM IST

मोस्ट अवेटेड सँडलवुड रॉकिंग स्टार यश याची जबरदस्त भूमिका असलेला KGF Chapter 2 हा चित्रपट आज थिएटरमध्ये दाखल झाला आहे. चाहते चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत होते आणि प्रदर्शित झाल्यावर त्यांनी त्याचे मनापासून स्वागत केले. चाहत्यांनी चित्रपटगृहांसमोर फटाके फोडून आनंद साजरा केला. दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर, चाहत्यांना त्यांच्या आवडत्या स्टारला पडद्यावर पाहण्याचा आनंद झाला. बंगळुरू येथील त्रिवेणी सिनेमाबाहेर यश या स्टारचे कटआउट्स उभारण्यात आले आणि पुष्पहार घालण्यात आला. अहवालानुसार, 72 फूट कटआउट सजवण्यासाठी त्याच्या चाहत्यांनी 3 लाख रुपयांच्या हारांचा वापर केला. प्रशांत नील दिग्दर्शित, सुपरस्टार यश अभिनीत 'KGF' ने बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला होता. त्याची पुनरावर्ती सिक्वेलमध्ये होताना दिसत आहे. अभिनेता यश (रॉकी भाई), संजय दत्त (अधीरा), आणि रवीना टंडन (रमिका सेन) यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट कन्नड, तेलगू, हिंदी, तमिळ आणि मल्याळम भाषेत प्रदर्शित होईल. होंबळे फिल्म्सच्या बॅनरखाली हा सिनेमा विजय किरगांडूर निर्मित आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:22 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details