महाराष्ट्र

maharashtra

अपघाताचा व्हिडिओ

ETV Bharat / videos

Bike Hit Students : कॉलेजला जाणाऱया विद्यार्थिनींना दुचाकीची जोरदार धडक; Watch Video - दुचाकीची मुलींना धडक व्हिडिओ

By

Published : Jul 27, 2023, 5:04 PM IST

Updated : Jul 27, 2023, 9:29 PM IST

केरळ -येथील मुवट्टुपुझा येथे भरधाव दुचाकीने दोन विद्यार्थिनींना जोरदार धडक दिली. या अपघातात एका विद्यार्थीनीचा मृत्यू झाला, तर दुसरी गंभीर जखमी झाली आहे. यासोबतच दुचाकीस्वारालाही दुखापत झाली आहे. या घटनेचा सीसीटीव्ही समोर आला असून, यातून या अपघाताची भीषणता दिसून येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास मुवट्टुपुझा येथील निर्मला महाविद्यालयासमोर हा अपघात झाला. पोलिसांनी सांगितले की, अॅन्सन रॉय (२२) असे दुचाकीस्वाराचे नाव असून, तो अन्ननलूर पूर्व येथील रहिवासी आहे. दुचाकीस्वारावर IPC 304A अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाविद्यालयात जाण्यासाठी मुली चालत रस्ता ओलांडत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसून येत आहे. त्याचवेळी एक जोरदार दुचाकी येऊन या मुलींना धडक देत असल्याचेही यात दिसत आहे. या धडकेनंतर त्या मुली लांबपर्यंत उडून जाऊन पडल्या होत्या. यात एका मुलीचा मृत्यू झाला आहे. 

Last Updated : Jul 27, 2023, 9:29 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details