महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Dhantrayodashi : धन्वंतरी पूजेला ठेवा धने आणि गुळचा प्रसाद, आज धन्वंतरी जयंती - Dhanwantari Puja

By

Published : Oct 22, 2022, 2:31 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:29 PM IST

नाशिक आज धन्वंतरी जयंती (Dhanwantari Jayanti) सर्वत्र साजरी केली जात आहे. आरोग्याची देवता म्हणून धन्वंतरी देवतेस ओळखले जाते. धन्वंतरी देवतेला धने आणि गुळ प्रसादाला विशेष (Keep coriander and jaggery prasad for Dhantrayodashi Puja) महत्व आहे. कोरोना काळात रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी वनस्पतींचा वापर महत्वाचा ठरला आहे. त्यामुळे यावेळी धन्वंतरी जयंतीला महत्व प्राप्त झालं असून परदेशातील नागरिक देखील आयुर्वेदीक उपचाराकडे वळत असल्याचे मतं वैद्य विक्रांत जाधव यांनी व्यक्त केले. जाधव म्हणाले की आश्विन कृष्ण त्रयोदशी अर्थात धन्वंतरी जयंतीला समुद्रमंथनातून प्रकटलेल्या चौदा रत्नां पैकी एक भगवान धन्वंतरी भूतलावरील प्रत्येक व्यक्तीच्या आरोग्य रक्षणासाठी प्रकट झाले. धन्वंतरी हे विष्णूचे अवतार मानले जातात. धन्वंतरीच्या हातात चार आयुधे आहेत. एका हातात शंख, दुसर्‍या हातातील सूर्यदर्शन चक्र हे शल्यचिकित्सक यांचे प्रतीक आहे. तिसऱ्या हातातील जलोका अर्थात जळवा हा प्राणी अशुद्ध रक्त शोषून घेतात. तर चौथ्या हातातील अमृतकलश औषधाचे प्रतीक आहे. Dhantrayodashi . Dhanwantari Puja.
Last Updated : Feb 3, 2023, 8:29 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details