कार्तिकी एकादशी सोहळा, चंद्रभागा नदीपात्र स्वच्छ ठेवण्याची भाविकांची मागणी - Chandrabhaga River
Published : Nov 23, 2023, 5:55 PM IST
सोलापूर (पंढरपूर) Kartiki Ekadashi 2023 : पंढरपूरमध्ये आज लाखो भाविकांच्या उपस्थितीमध्ये कार्तिकी एकादशीचा सोहळा संपन्न झाला. राज्यभरातून लाखो भाविक पंढरपूरमध्ये दाखल झाले होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा केली. भाविकांनी चंद्रभागेच्या पात्रांमध्ये (Chandrabhaga River) स्नान करून नामदेव पायरीचे दर्शन घेतलं. कार्तिकी एकादशीच्या सोहळ्यासाठी (Kartiki Ekadashi Celebration) येणाऱ्या भाविकांसाठी प्रशासनानं उजनी धरणातून (Ujani Dam) पाणी नदी पात्रामध्ये सोडलं होतं. मात्र, हे सोडलेले पाणी रात्री उशिरापर्यंत पंढरपूरमध्ये दाखल झालं नसल्यामुळं, भाविकांची मोठी गैरसोय झाली होती. आज सकाळी पाणी चंद्रभागा नदीत आले. पाणी कमी असल्यामुळं आणि पाणी अस्वच्छ असल्यानं भाविकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.