महाराष्ट्र

maharashtra

अर्थमंत्री निर्मला सितारामन

ETV Bharat / videos

Karnataka Assembly Election 2023 : कर्नाटकच हनुमानाचे जन्मस्थळ-निर्मला सीतारामन

By

Published : May 10, 2023, 2:22 PM IST

बंगळुरू :कर्नाटक विधानसभा निवडणूक 2023 साठी आज सकाळपासून मतदान सुरु आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा करिश्मा चालणार असल्याचे दावा अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी केला आहे. यावेळी त्यांनी नागरिकांनी मतदान करण्याचे आवाहनही केले आहे. यावेळी बोलताना अर्थमंत्री निर्मला सितारामन म्हणाल्या की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे करिष्माई नेते आहेत. त्यांची जादू केवळ कर्नाटकातच नाही तर संपूर्ण देशात चालते. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा करिश्मा कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत चालणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कर्नाटकच हनुमानाचे जन्मस्थळ असल्याचेही त्यांनी म्हटले. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी कर्नाटकच्या विकासासाठी जनतेला मतदान करण्याचे आवाहन केले. तत्पूर्वी, मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी हुबळी येथील हनुमान मंदिरात प्रार्थना केली. इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती त्यांच्या पत्नीसह बंगळुरू येथील मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी पोहोचले. सुधा मूर्ती यांनी मतदान केल्यानंतर तरुण मतदारांना संदेश देऊन मतदान करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

हेही वाचा - 

1) Donald Trump News : डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का, लैंगिक शोषणप्रकरणी न्यायालयात ठरले दोषी

2) Karnataka Assembly Election 2023 : कोणाला मिळणार कर्नाटकच्या सत्तेचा मुकूट, सकाळी 9 वाजेपर्यंत 8.11 टक्के मतदान

ABOUT THE AUTHOR

...view details