Solapur News: चिंब पावसात जैन समाजाचा विराट मोर्चा; संतांवर वाढत्या हल्ल्यांच्या विरोधात दिला इशारा - Attacks on Hindus
सोलापूर : कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी गावात जैन महाराजांची निर्घृण हत्या करण्यात आली. या हत्येच्या निषेधार्थ शुक्रवारी सायंकाळी सोलापुरातील जैन समाज बांधवानी मोर्चा काढला होता. शहरातील बाळीवेस येथील श्रविका शाळेतून हा मूक मोर्चा सुरू झाला आणि सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर चालून आला. या मोर्चात कालीचरण महाराजांनी सहभाग घेतला. त्यावेळी ते म्हणाले की, साधू संतांच्या हत्या होत आहेत, हे अतिशय निंदनीय आहे. या घटनेचा शांततेने निषेध न करता जशास तसे उत्तर देणे गरजेचे आहे. कर्नाटक राज्यात धर्म विरोधी सत्ता असल्याने जैन समाजाच्या संतांवर असा हल्ला झाला, असेही मत कालीचरण महाराजांनी व्यक्त केले. तर यावेळी श्रविका प्रशालेपासून जवळपास 500 जैन बांधवानी मोर्चा सुरू करताच पावसाची सुरुवात झाली. चिंब पावसात देखील हा मोर्चा थांबला नाही. सर्व जैन बांधव हे भिजत सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकत्रितपणे येऊन कर्नाटकात झालेल्या जैन संताच्या हत्येचा निषेध केला.