Jyotiraditya Scindia in Kolhapur ज्योतिरादित्य सिंधिया यांनी छत्रपती शाहू महाराजांच्या समाधी स्मारकाला भेट देऊन केले अभिवादन - Samadhi memorial of Chhatrapati Shahu Maharaj
Jyotiraditya Scindia in Kolhapur कोल्हापूर केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या समाधी स्मारकाला भेट देऊन अभिवादन केले. राजर्षी शाहू महाराजांसारखा महान राजा होणे नाही, असे सांगत त्यांनी त्यांच्या कार्याची ओळख केवळ कोल्हापूर पुरती मर्यादित न ठेवता देशात आणि जगभरात पोहोचवली असल्याचे गौरवोद्गार काढले. तसेच समाजाप्रती त्यांची असलेली तळमळ नेहमी दिसून आली होती, असेही त्यांनी यावेळी म्हंटले. यावेळी समाधी स्मारक येथे शाहूंच्या पुतळ्याला अभिवादन करून त्यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी ते बोलत होते.
Last Updated : Feb 3, 2023, 8:33 PM IST